संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाने उचललं मोठं पाऊल,नेमकं कारण काय?उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितलं
कुणीही मास्टरमाई असेल त्याला सोडणार नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाने उचललं मोठं पाऊल,नेमकं कारण काय?उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितलं
कुणीही मास्टरमाई असेल त्याला सोडणार नाही
बारामती वार्तापत्र
महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मात्र, या खातेवाटपानंतर एका मंत्र्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचे बीड (Beed) जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असलेल्या वाल्किम कराड याच्याशी मुंडेंचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये, त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करू नये, अशी मागणी करण्यात येत होती.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. भेट घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले, संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली. त्याचे दुःख सगळ्यांना आहे. इथे कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. दोषींना फाशीची शिक्षा होणार आहे. याचा कुणीही मास्टरमाईंड असेल त्याला सोडणार नाही. याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा निर्णय घेतला आहे. यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. मी सरकारच्या वतीने संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत कुणालाही सोडले जाणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
मराठा क्रांती मोर्चाने पत्रात काय म्हटलंय?
मराठा सरपंच बांधव कै. संतोष देशमुख यांचा परळी येथे नुकतीच निघुर्ण हत्या झाली. सदरची हत्या ही केवळ कै संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत व त्याचा सर्वात मोठा अडसर हा आपले पक्षाचे आमदार व मंत्री श्री धनंजय मुंडे या नेत्याला होत होता म्हणुन सदरील नेत्याने इतर गुंडामार्फत म्हणजेच वाल्मिक कराड व इतर यांचेमार्फत हत्या केलेचे दिसून येत आहे. त्यामुळे या हत्येमधील जेवढे गुन्हेगार व गुन्हेगारांचा नेता धनंजय मुंडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच धनंजय मुंडे यांची मंत्री मंडळातुन हकालपट्टी करण्यात यावी व सदरील गुन्हांचा तपास जलद गतीने व्हावा, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय.
नाराजी चालतच राहणार
या मंत्रिमंडळात मंत्रिपद देताना अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. काही मंत्र्यांची जुनी खाती काढून घेण्यात आली. त्याजागी त्यांना कमी महत्वाची खाती मिळाली. मंत्रिपदाचा अनुभव नसणाऱ्या नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली. या सर्व घडामोडींमुळे नाराजी सुरू झाल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत. ज्यांना हवं ते खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत. हे चालतंच असतं. प्रत्येकाने त्यांना मिळालेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो.