संत तुकाराम महाराज यांचे अकरावेवंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
चार हृदयद्रावक सुसाईड नोट आल्या समोर
संत तुकाराम महाराज यांचे अकरावेवंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
चार हृदयद्रावक सुसाईड नोट आल्या समोर.
पिंपरी चिंचिंचवड;प्रतिनिधि
शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले आणि संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांचा पंचक्रोशीत मोठा लौकीक होता. पण त्यांनी देहूमध्ये आज आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याच्या हुकाला उपरण्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक नाही तर चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. त्यात त्यांनी आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. (Shirish Maharaj More Dies in Dehu)
शिरीष महाराज मोरेंनी लिहिलेल्या पहिल्या चिठ्ठीमध्ये आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीमध्ये कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीमध्ये आपल्या मित्रांना संदेश दिला आहे. “माझ्यावर एकूण 32 लाखांचे कर्ज असून ते कर्ज मी कोणाकडून किती घेतले आहे, याची कल्पना बाबांना आहे. या सर्वांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. 32 लाखांपैकी कार विकून 7 लाख फिटतील.
उरलेलं 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्यावी, अशी विनंती शिरीष महाराज मोरेंनी आपल्या मित्रांना केली आहे. लढण्याची ताकत माझ्यात उरली नसल्याने हे टोकाचं पाऊल उचलत आहे. तसेच इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची त्यांनी माफी मागितली आहे. मी माझ्या होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती. पण ती पूर्ण न करता मी निघालो आहे. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग, असे शिरीष महाराज मोरेंनी चिठ्ठीत नमूद केले आहे.
शिरीष महाराज मोरे यांचे निगडी येथे इडलीचे उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण मोरे कुटुंबावर आणि वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.