बारामतीत कंटेनमेंट झोन नुसार होणार लाॅकडाऊन, नविन निर्णयाची लवकरच होणार घोषणा..
बारामती येत्या ७ सप्टेंबरपासून १४ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक समजते..

बारामतीत कंटेनमेंट झोन नुसार होणार लाॅकडाऊन, नविन निर्णयाची लवकरच होणार घोषणा.
बारामती येत्या ७ सप्टेंबरपासून १४ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक समजते..
बारामती : वार्तापत्र
व्यवसाय आणि उद्योगांवर संक्रमण नको म्हणून बाजारपेठा व व्यवहार सुरू ठेवले, परंतु नंतर बारामती आणि बारामती तालुक्यात कोरोनाचा जो उद्रेक झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन बारामती येत्या ७ सप्टेंबरपासून १४ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक समजते..
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक सुरू असून या बैठकीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ पदाधिकारी, औद्योगिक वसाहतीच्या वतीने धनंजय जामदार, प्रमोद काकडे यांच्यासह प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुक्यातील विविध खात्यांचे अधिकारी तसेच कोरोनाविरोधात लढणाऱ्या सर्व घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या लॉकडाऊन संदर्भातील नियम, अटी व इतर माहिती प्रांताधिकारी जाहीर करणार असल्याची माहिती .