संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकत्र,कु. ऋतुजा पाटील व जय अजितदादा पवार यांचा वाड:निश्चय समारंभ संपन्न
फलटणची लेक आता अजितदादा पवारांची सुनबाई

संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकत्र,कु. ऋतुजा पाटील व जय अजितदादा पवार यांचा वाड:निश्चय समारंभ संपन्न
फलटणची लेक आता अजितदादा पवारांची सुनबाई
बारामती वार्तापत्र
अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा समारंभ १० एप्रिल रोजी पार पडला. मतभेद असले तरी नातवाला आशीर्वाद देण्यासाठी समारंभाला शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि जावई सदानंद सुळे, सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
या समारंभाला विशेष मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि तो पारंपारिक पद्धतीने साखरपुडा सोहळा थाटामाटाने पार पडला. शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यांचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून साखरपुड्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. भर समारंभा दरम्यान शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवारांसह कार्यक्रम स्थळी दाखल होताच त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः अजित पवार त्यांना घेण्यासाठी गेटवर गेले होते.
साखरपुड्यात झालेल्या भेटीमुळे पवार कुटुंबाच्या राजकीय घडामोडींच्या भविष्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याने, या कुटुंब पुनर्मिलनाचा त्यांच्या राजकीय संबंधांवर काही परिणाम होईल का, असे प्रश्न या समारंभामुळे उपस्थित झाले आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा सोहळा असला तरी यानिमित्ताने मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंब एकत्र दिसून आले. या कुटुंब पुनर्मिलनाचा राजकीय घडामोडींवर काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.