टेक्स्टाईल पार्क येथे बारामती वकील संघटना व विधी सेवा समितीच्या वतीने महिला व कामगार विषयक कायदे विषयक शिबिर संपन्न
महिलांवरील अत्याचार व कामाच्या ठिकाणी होणार्या अन्याय विरूध्द आवाज उठवून कायद्याचा आधार घ्यावा

टेक्स्टाईल पार्क येथे बारामती वकील संघटना व विधी सेवा समितीच्या वतीने महिला व कामगार विषयक कायदे विषयक शिबिर संपन्न
महिलांवरील अत्याचार व कामाच्या ठिकाणी होणार्या अन्याय विरूध्द आवाज उठवून कायद्याचा आधार घ्यावा
बारामती वार्तापत्र
मा. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने बारामती तालुका विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ऑक्टोबर २०२१ रोजी टेक्स्टाईल पार्क MIDC ,बारामती, जिल्हा पुणे येथे महिला व कामगार विषयक कायद्याची माहीती महिलांना व्हावी याकरता महिला विषयक कायदे , कामगार कायदे याविषयावर ॲड आरती काकडे मॅडम व ॲड प्रिती शिन्दे मॅडम यांचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा J.P. दरेकर मॅडम जिल्हा न्यायाधीश , मा कांबळे साहेब व मा. गिर्हे साहेब फौजदारी व दिवाणी न्यायाधीश क स्तर बारामती तसेच बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅङ चंद्रकांत सोकटे, उपाध्यक्ष अॅङ स्नेहा भापकर, सचिव अॅङ अजित बनसोङे, महिला प्रतिनिधी अॅङ प्रणिता जावळे, अॅङ सावंत अॅङ धीरज लालबिगे, अॅङ संजय नाळे, टेक्स्टाईल पार्क चे सि ई ओ मा संकेश्वरकरसाहेब व सर्व युनिटचे प्रतिनिधि, बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमात प्रास्तविक अॅङ चंद्रकांत सोकटे यांनी केले .
तसेच मा. जिल्हा न्यायाधीश दरेकर मॅडम बोलताना म्हणाल्या की , महिलांवरील अत्याचार व कामाच्या ठिकाणी होणार्या अन्याय विरूध्द आवाज उठवून कायद्याचा आधार घ्यावा तसेच विधी सेवा समिती मार्फत पुरवल्या जाणार्या योजनाची माहिती दिली सदर कार्यक्रमास टेक्स्टाईल पार्क येथील सर्व भगिनी हजर होत्या