संभाजी ब्रिगेड च्या वतीने कृषी विधेयकाविरोधात आंदोलन
दगडाला हार घालून केंद्र सरकारचा निषेध
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड च्या वतीने आज शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करावे ,दिल्लीतील शेतकरी आंदोलकांवर हुकूमशाही पद्धतीने केलेली कारवाई थांबवावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्यावतीने दगडाला पुष्पहार घालून सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देऊन पंतप्रधानांपर्यंत हे निवेदन पोहोचवावे असे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेड च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनेक दिवसापासून शेतकरी त्यांच्या शेत मालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा म्हणत असताना त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे शेतमाल विक्री कायदा लागू करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे खच्चीकरण होईल व भांडवलशाही व्यवस्था निर्माण होईल त्यामुळे हा कायदा थांबविण्यात यावा शेतमाल विक्री कायदा ,कंत्राटी शेती कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा हे कायदे त्वरित रद्द करावेत व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलकांवरील दडपशाही तात्काळ थांबवावी ,शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आगामी काळात प्रस्तावित असलेले शेतकरी वीज बिल विधेयक पुढे रेटणे थांबवावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार ,जिल्हा सचिव विनोद जगताप, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल काळकुटे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश चव्हाण संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे उपाध्यक्ष योगेश जगताप इंदापूर तालुका अध्यक्ष मकरंद जगताप बारामती तालुका सचिव सोमनाथ जाधव कार्याध्यक्ष मयूर जाधव इंदापूर तालुका सचिव शुभम चव्हाण भवानीनगर चे अध्यक्ष बबन पवार उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उद्योजक कक्ष अजित चव्हाण दत्तात्रय जाधव राहुल मोरे सोमनाथ भोसले अभिजीत जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते