संविधान दिनाचे औचित्य साधून समता सैनिक दलाच्या वतीने इंदापूरातील वाचनालयास महापुरुषांच्या पुस्तकांची भेट
ज्ञानदानाच्या कार्याला बळ
संविधान दिनाचे औचित्य साधून समता सैनिक दलाच्या वतीने इंदापूरातील वाचनालयास महापुरुषांच्या पुस्तकांची भेट
ज्ञानदानाच्या कार्याला बळ
बारामती वार्तापत्र
भारतीय संविधान दिन इंदापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून “समता सैनिक दल” या सामाजिक संघटनेच्या वतीने इंदापूर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयास फुले, शाहु, आंबेडकरी विचारधारेच्या पुस्तकांच्या संचाची भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ मार्गदर्शक सलिम शेख,प्रमुख पाहुणे म्हणून इंदापुर ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, इंदापुर तालुकाध्यक्ष तानाजी मोरे, तालुका संपर्क प्रमुख सतीश देठे, आरपीआयचे इंदापूर शहराध्यक्ष अमोल मिसाळ, सुनिल सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमाला तुषार ढावरे, अमित ढावरे, नागेश शिंदे, अभिजीत अवघडे अन्य सामाजिक बांधव व विद्यार्थी मित्र उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालय अधिक्षक नंदकुमार खंडाळे व उमेशभाऊ ढावरे यांनी परिश्रम घेतले.