स्थानिक

संस्कार व शिक्षण मुळे उत्कृष्ट तरुण पिढी घडवणार : सतीश खोमणे

विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादरीकरण केले.

संस्कार व शिक्षण मुळे उत्कृष्ट तरुण पिढी घडवणार : सतीश खोमणे

विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादरीकरण केले.

बारामती वार्तापत्र 

देशाच्या प्रगतीसाठी उत्तम,हुशार, होतकरू युवक पाहिजेत असे युवक संस्कार व शिक्षणा मुळे घडतात असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांनी केले.

कै. लक्ष्मीबाई पवार एज्युकेशन फाउंडेशन संचलित फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल कनेक्ट पोदार जम्बो किड्स सूर्यनगरी बारामती यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश खोमणे मार्गदर्शन करत होते.

याप्रसंगी माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन शेंडे,शिवनगर चे विश्वसत धन्य कुमार जगताप, संस्थेचे संचालक तुकाराम पवार व ओंकार पवार डॉ स्नेहल पवार आणि मुख्यध्यापिका मोनिका झगडे व सारिका उगले, साधना बोराटे, सोनाली शिंदे, प्रियांका जाधव, मोना जाधव, बोराटे, डहाळे उपस्तीत होते.

सदर शिक्षण संस्थेने उत्तम शिक्षण देत बालवयात संस्काराची शिदोरी दिल्याने भविष्यात आदर्श व सुजाण नागरिक घडणार असल्याचे माळेगावचे संचालक नितीन शेंडे यांनी सांगितले.
देशभक्ती,पारंपारीक गीते च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादरीकरण केले.याप्रसंगी सूत्रसंचालन गीतांजली ढोले यांनी तर आभार निलोफर मिस यांनी मांनले.

Back to top button