
सकल जैन समाज बारामती तर्फे जाहीर निषेध मोर्चा
सर्व दुकाने व व्यवहार संपूर्ण दिवस बंद!
बारामती वार्तापत्र
विलेपार्ले, मुंबई येथील ३५ वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने बुलडोझरने पाडले. तेथील जिनमूर्ती व जिनशास्त्राची विटंबना व अवहेलना झाली. यामुळे भारतभरातील व विशेषतः महाराष्ट्रातील संपूर्ण सकल जैन समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत.
समाजामध्ये संतापाची भावना आहे. या घटनेचा जाहीर तीव्र निषेध नोंदविण्यासाठी व संबंधित अधिकाऱ्यांवर यथायोग्य कारवाई करून जैन मंदिराची पुनर्स्थापना करणेबाबत महाराष्ट्र शासनाकडे आग्रही मागण्या मांडण्यासाठी गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी बारामती येथील सकल जैन समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे.
हा मोर्चा गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री मुनिसुव्रत दिगंबर जैन मंदिर महावीर पथ येथून निघून गांधी चौक – सुभाष चौक – भिगवण चौक – इंदापूर चौक या मार्गाने प्रशासकीय इमारत येथे पोहोचेल व त्यावेळी सर्व संबंधितातर्फे मा. प्रांताधिकारी यांना जाहीर निवेदन देण्यात येईल.
तरी सर्व समाजबांधवांनी शांततामय व अहिंसकपणे मोर्चामध्ये सहभागी व्हावे व सर्व दुकाने व व्यवहार संपूर्ण दिवस बंद ठेवावीत असे आवाहन सकल जैन समाजातर्फे करण्यात येत आहे.
श्री.किशोरकुमार जिनदत्त शहा श्री.मनोज मिश्रीलाल मुथा श्री.दिलीप भ. धोका श्री १००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन देवस्थान श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ श्री श्वेतांबर स्थानकवासी संघ बारामती.