राजकीय

सचिन सातव यांची बारामतीकरांसोबत चाय पे चर्चा; तरुणाई आणि नागरीकांशी विविध विषयावर संवाद..!

मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर

सचिन सातव यांची बारामतीकरांसोबत चाय पे चर्चा; तरुणाई आणि नागरीकांशी विविध विषयावर संवाद..!

मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर

बारामती वार्तापत्र 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांनी आज बारामती शहरातील विविध भागात जाऊन नागरीक आणि तरुण वर्गाशी संवाद साधला.. सध्याची आणि आगामी बारामती या विषयावर त्यांनी उपस्थितांशी चर्चा केली.. नागरीक, तरुण आणि नोकरदार वर्गाने या चर्चेत सहभाग घेत स्पष्ट मते मांडली..

बारामती नगर परिषदेची निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे.. त्यामुळं आता उमेदवारांनी पुन्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे.. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला आहे. काल सचिन सातव यांनी दुचाकीवरुन प्रवास करत विविध भागातील चहाच्या स्टॉल्सना भेटी देत चाय पे चर्चा या हटके स्टाईलनं युवक, नागरीक आणि नोकरदारांशी संवाद साधला..

शहरातील खंडोबानगर, सातव चौक, भिगवण रोड, पेन्सिल चौक, संभाजीनगर, शिवाजीनगर, तानाई नगर, रुई पाटी आधी विविध चौकात त्यांनी चाय पे चर्चा करत हटके प्रचार केला..

Back to top button