सत्याचा संदेश जनसामान्यां पर्यंत पोहोचविणारे हरदेवसिंह जी महाराज ! – नंदकुमार झांबरे

भक्तीचा प्रवाह निरंतर आपल्या जीवनात वाहत राहायला हवा.

सत्याचा संदेश जनसामान्यां पर्यंत पोहोचविणारे हरदेवसिंह जी महाराज ! – नंदकुमार झांबरे

भक्तीचा प्रवाह निरंतर आपल्या जीवनात वाहत राहायला हवा.

बारामती वार्तापत्र

संत निरंकारी मिशनचे तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत संत निरंकारी मिशनचा ‘१३ मे समर्पण दिवस’ या निमित्ताने जंक्शन येथील नंदिकिश्वर विद्यालयात सायंकाळी ६ ते ९ यावेळेत विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन केले होते.

सदरचा सत्संग सोहळा सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी बारामतीसह इंदापूर तालुक्यातील दिड ते दोन हजारचा जनसमुदाय उपस्थित होता.बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या आठवणींना उजाळा देताना श्री. झांबरे म्हणाले, युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांचा सर्वप्रिय दिव्य स्वभाव व त्यांचे अलौकिक विचार मानव कल्याणार्थ समर्पित होते. त्यांनी पूर्ण समर्पण, सहनशीलता आणि विशालतेच्या भावनांनी युक्त होऊन ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून सत्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचविला आणि विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेला वास्तविक रूप प्रदान केले.

निरंकारी बाबा हरदेवसिंह जी महाराज यांनी मानवतेचे दिव्य स्वरूप साकार करण्यासाठी निरंकारी संत समागमागमांची अविरत शृंखला पुढे नेली ज्यामध्ये सर्वांना ज्ञानरुपी धाग्यामध्ये गुंफून प्रेम, नम्रता यांसारख्या दिव्य गुणांनी परिपूर्ण केले. ‘मानवता हाच माझा धर्म होय’ हे कथन सार्थक करत संत निरंकारी मिशनची शिकवण त्यांनी लहान-सहान वस्त्यांपासून ते विदेशापर्यंत विस्तृतपणे पसरविली. त्यांनी हेच समजावले, की भक्तीचा प्रवाह निरंतर आपल्या जीवनात वाहत राहायला हवा.

मानव कल्याणाच्या प्रति समर्पित सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज आयुष्यभर आध्यात्मिक मार्गदर्शकाच्या रूपात मानवमात्राला सत्याचा मार्ग दाखवत राहिले. वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सकारात्मक स्वरूप देत हा दृष्टिकोण नवऊर्जा व तन्मयतेने पुढे घेऊन जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram