इंदापूर

सपकळवाडी ग्रामस्थांनी नदीजोड बोगद्याचे काम पाडले बंद

विहिरीचे पाणी गेले व घरांना तडे गेले

सपकळवाडी ग्रामस्थांनी नदीजोड बोगद्याचे काम पाडले बंद

विहिरीचे पाणी गेले व घरांना तडे गेले

बारामती वार्तापत्र
नीराभीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाचे काम सणसर येथे सुरू झालेले आहे. हे काम आज सकाळी येथील संतप्त शेतकऱ्यांनी,महिला, मुलांसह बंद पाडले.
याविषयीची माहिती अशी की सणसर ता इंदापूर येथे नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू आहे.नीरा नदी वर बॅरेज बांधुन ते पाणी बोगद्या ने उजनी धरणात टाकून तेथून मराठवाड्यासाठी हे पाणी देण्यात येणार आहे. मात्र हा प्रकल्प करत असताना नागरिकांना कोणत्याही पपरिस्थितीत विश्‍वासात न घेता काम सुरू केले आहे. येथील ऐंशी ते शंभर फूट खोल असणाऱ्या बोगद्यामुळे परिसरातील 1 किलोमीटर अंतरातील विहिरींचे व बोअरवेलचे पाणी अचानक गायब झाले आहे. पाण्याची पातळीही खालवली आहे.तसेच येथील रहिवाशांच्या घरांना तडे गेले आहेत. याची दखल कोणीच घेत नव्हते .त्यामुळे आज सपकळवाडी च्या शेतकऱ्यांनी महिला, मुलांसह बोगद्याच्या कामाच्या ठिकाणी जात काम बंद करण्यास भाग पाडले.

या बोगाध्यामुळे आमच्या जमिनी उजाड होणार असून आमचे कायमस्वरूपी चे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद करावा. आम्हाला गेलेल्या पाण्याच्या बदल्यात पाणी द्यावे. प्रकल्पग्रस्तांचे दाखले द्यावेत व नुकसान भरपाई द्यावी. घरांना पडलेले चिरा यामुळे घराच्या भिंती अंगावर पडण्याची शक्यता आहे शेतीपूरक व्यवसायाचे ही यामुळे नुकसान झाले आहे.त्यामुळे नुकसानीचे मुल्यांकन करून योग्य मोबदला द्यावा या मागणीवरून आज शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. या आंदोलनास सपकळवाडी चे सरपंच सचिन सपकळ, उमेश सपकळ, तुषार सपकळ, राजेंद्र सपकळ, जगदीश सपकळ, महादेव सपकळ ,शत्रुघ्न घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram