आपला जिल्हा

सफाई महिला कामगारांना साड्या व दिवाळी फराळाचे वाटप

सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीत साड्यांचे वाटप..

सफाई महिला कामगारांना साड्या व दिवाळी फराळाचे वाटप

सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीत साड्यांचे वाटप..

इंदापूर,प्रतिनिधी –

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे दिवाळी सणानिमित्त सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेच्या वतीने निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांना व परिसरातील गरीब महिलांना दिवाळी फराळ व साडी वाटप करण्यात आले. सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष व सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीत साड्या व फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी तंटामुक्तीची माजी अध्यक्ष दत्तात्रेय चांदणे, सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे संचालक भीमराव बोराटे, भगवान घाडगे, भानुदास राऊत, रामचंद्र करे, माजी उपसरपंच सचिन चांदणे, नागेश कांबळे, अमोल चांदणे, किरण चांदणे, अर्जुन घाडगे, माणिक ननवरे, प्रशांत बरळ, किरण जौजाळ, दत्तात्रय बारवकर, विठ्ठल पापत , प्रशांत भिसे, सुधाकर भोंग, कांतिलाल देवकर, धनंजय राऊत तसेच श्री सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

_____________________________________________फोटो: निमगाव केतकी ता.इंदापूर: सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेच्या वतीने महिलांना साड्या व फराळाचे वाटप करण्यात आले.

Back to top button