समता सैनिक दलाची इंदापुर तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर
गांव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक निर्माण करण्याचे उद्दिष्ट

समता सैनिक दलाची इंदापुर तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर
गांव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक निर्माण करण्याचे उद्दिष्ट
इंदापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधतं शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी शनिवारी (दि.१९) समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक पोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये इंदापुर तालूक्याच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारणीनुसार इंदापूर तालुकाध्यक्षपदी तानाजी मोरे,उपाध्यक्षपदी शशिकांत गायकवाड, तालुका सचिवपदी संकेत चितारे, संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. जयप्रकाश नारायण पोळ,तालुका संपर्कप्रमुख म्हणून सूर्यकांत चव्हाण,कार्याध्यक्षपदी शामराव जाधव, तर संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून जयसिंग जाधव हे असणार आहेत.
यावेळी संघटनेच्या ध्येय व धोरणांविषयी चर्चा करण्यात आली.प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष अशोक पोळ म्हणाले की,समता सैनिक दल हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन.१९२७ साली स्थापित केलेले संघटन आहे. समता प्रस्थापित करणे हेचं समता सैनिक दलाचे ध्येय आणि उद्दिष्ट असुन याचे तालुक्यातील प्रत्येक नूतन पदाधिकाऱ्याने आचरणं करणे गरजेचे आहे.
समता सैनिक दल या संघटनेची रचना गांव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक निर्माण व्हावे हिचं बाबासाहेबांची संकल्पना होती बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा त्याग नजरेसमोर ठेऊन प्रत्येक पदाधिका-यांनी सामाजिक कार्य करावे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संकेत चितारे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीकरण्याकरिता भाऊसाहेब झेंडे, दत्तात्रय सावंत, गणेश गार्डे, रमेश क्षिरसागर, संतोष जाधव, राजेंद्र जमदाडे यांनी परिश्रम घेतले.