मुंबई

सरकारचा नागरिकांना दिलासा गुंठेवारी नियमित करणार

राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारीच्या योजना प्रलंबित आहेत.

सरकारचा नागरिकांना दिलासा गुंठेवारी नियमित करणार

राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारीच्या योजना प्रलंबित आहेत.

मुंबई :बारामती वार्तापत्र

सध्या शहरांचा वाढता विस्तार आणि लोकांचा ग्रामीण भागातून शहरात जाण्यासाठीचा प्रयत्न त्यातून शहरात एक गुंठे दोन गुंठे अशी जागा सामान्य नागरिक घेतो .मात्र गुंठेवारी बंदी असल्यामुळे नागरिक नोटरी किंवा इतर क्लुप्त्या काढत खरेदीचे व्यवहार करत होते. मात्र आता त्यांच्यासाठी खुशखबर असून शासनाने गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारीच्या योजना प्रलंबित आहेत. त्या नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला शासनाने 2001 मध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा केला होता. त्यामुळे 2001 पूर्वीच्या गुंठेवारी योजनांना त्याचा लाभ झाला होता. मात्र ज्या गुंठेवारी प्रलंबित आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.

पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन देऊन गुंठेवारी नियमित करावी अशी मागणी केली होती .त्यानुसार आता राज्यातील गुंठेवारी नियमित होणार

या अधीनियमांमुळे राज्यातील बरेच गुंठेवारी क्षेत्र नियमित असले तरी देखील अद्याप काही क्षेत्राचे नियमितीकरण प्रलंबित आहे त्यामुळे या अंमलबजावणीची तारीख वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे . तसेच पात्रतेच्या कोणत्याही निकषांमध्ये अथवा अटींमध्ये बदल करण्यात आलेला नाही . सामान्य नागरिकाला याचा निश्‍चित फायदा होणार आहे त्यामुळे सरकारचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button