सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या; कोरोनापरिस्थितीमुळे सरकारचा आदेश
दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी नवनवीन उच्चांक गाठत आहे.
सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या; कोरोनापरिस्थितीमुळे सरकारचा आदेश
दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी नवनवीन उच्चांक गाठत आहे.
मुंबई – बारामती वार्तापत्र
राज्यातील कोरोनाची चिंताजनक स्थिती पाहता राज्यात होणाऱ्या अनेक स्थानिक निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच मुंबईतील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
कोरोनाची साथ अद्यापही आटोक्यात नाही. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अवधी लागू शकतो. या दिवसांमध्ये राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे योग्य नाही. फक्त न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्था वगळता सर्व संस्थांच्या निवडणूका डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 51 हजार 153 झाली आहे. गेल्या 24 तासात 19 हजार 932 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रूग्ण बरे होण्याचा दर हा 77.71 आहे. गेल्या पाच दिवसांपासून मृतांची संख्या 400 पेक्षा अधिक झाली होती. ती 180 पर्यंत खाली आली. राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात 19 हजार 932 रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 10 लाख 49 हजार 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 77.71 टक्क्यांवर गेले आहे.