इंदापूर

” सवयी बदला कोरोना टाळा ” इंदापूर नगरपरिषदेकडून नागरिकांना जाहीर आवाहन

वाढत्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन केल्या सूचना

” सवयी बदला कोरोना टाळा ” इंदापूर नगरपरिषदेकडून नागरिकांना जाहीर आवाहन

वाढत्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन केल्या सूचना

इंदापूर : प्रतिनिधी

दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ” सवयी बदला कोरोना टाळा ” या घोषवाक्याच्या मथळ्याखाली इंदापूर नगरपरिषदेकडून परिक्षेत्रातील नागरिकांना जाहीर पत्रकाद्वारे तसेच घरोघरी जाऊन सूचना करण्यात येत आहेत.

मीच आहे माझा व माझ्या परिवाराचा रक्षक या घोषवाक्याला अनुसरून नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियम अटींचे व सूचनांचे जबाबदारीने पालन करण्याचे आवाहन इंदापूर नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान दि.६ रोजी प्रभाग क्र.१ मध्ये नगरपरिषदेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याबाबत तसेच कोरोना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या संदर्भात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा , आरोग्य विभाग सभापती तथा नगरसेवक अनिकेत वाघ, नगरसेविका सुवर्णा मखरे,नगरसेवक प्रशांत शिताप यांनी नागरिकांची विचारपूस करत आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे व सुरक्षितता बाळगणे यांविषयी मार्गदर्शन केले.

तसेच ज्यांच्या घरात वय वर्ष ४५ च्या पुढील व्यक्ती आहेत त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे का ? घेतली नसल्यास लवकरात-लवकर त्यांचे नाव उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे नोंदवून लसीकरण करून घेण्याच्या सूचना केल्या.लसीकरण करण्यास घाबरू नका उलट लसीकरण केल्याने कोरोना पासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल,सुरक्षित राहू अशा स्वरूपाच्या सूचना केल्या त्याबरोबरच शासनाने दिलेल्या सूचनांचे,आदेशांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,नितीन मखरे,आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ,सभा अधीक्षक गजानन पुंडे,प्रभाग अधिकारी मोहन ढोबळे, राजू भानवसे, दशरथ क्षिरसागर, अल्ताफ पठाण,अशोक चिंचकर,भागवत मखरे, सुधीर पारेकर इ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button