बारामती पाठोपाठ इंदापूर मध्येही कोरोना चा हाहाकार.
इंदापूर मधील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण.

बारामती पाठोपाठ इंदापूर मध्येही कोरोना चा हाहाकार.
इंदापूर मधील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दि.१३ जुलै रोजी इंदापूर शहरात पाच तर ग्रामीण मध्ये पाच असे एकूण दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाल्याने शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले असून प्रशासनापुढे एक आव्हान उभे राहिले आहे.
एकूण ४२ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहीती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे.
यामध्ये लासुर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचा रुग्णवाहिका चालकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून,१० जुलै रोजी भिगवण येथील एका ४० वर्षीय मृत महीलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्या महिलेच्या संपर्कातील ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे,तर अकोले येथील एका महीलेलाही कोरोना ची लागण झाली आहे.याशिवाय इंदापूर शहरातील महसूल खात्यातील एका मंडल अधिकाऱ्यासह ५ रुग्णांची देखील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी गडबडून न जाता व भीती न बाळगता काळजी घेण्याचे व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.