सहकारी संस्थांची निवडणूक, कोरोनामुळे पुन्हा लांबणीवर
सहकारी संस्थांच्या निवडणुका 4 वेळा पुढे ढकलल्या!
सहकारी संस्थांची निवडणूक, कोरोनामुळे पुन्हा लांबणीवर
सहकारी संस्थांच्या निवडणुका 4 वेळा पुढे ढकलल्या!
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
सहकारी संस्थाच्या निवडणुका तब्बल पाचवेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये २०२० मध्ये या निवडणुका ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १७ मार्चला पुन्हा ३ महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला.
पुढे अजून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती अखेर डिसेंबरला २०२० मुदत संपल्याने १६ जानेवारीला आदेश काढुन पुन्हा तिन महिने मुदतवाढ दिली होती मात्र राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून करोनाकाळातच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या.
अन्य राज्यांतही सर्व निवडणुका सुरू आहेत. अशा वेळी केवळ सहकारी संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर टाकणे चुकीचे असल्याने पुन्हा नव्याने २ फेब्रुवारीला आदेश काढुन निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले मात्र आता पुन्हा निवडणुका आहे त्या स्थितीत गृहनिर्माण संस्था वगळुन ३१ मार्च पर्यंत थांबीवण्यात आल्याचे आदेश मंत्रालयाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी काढले आहेत.
अर्थात उच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे,त तिथे कोरोना च्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मग निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि 250 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका बाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर सदर संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 5 हजार 629 जणांचं पॅनलही मंजूर करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र मार्च 2021 नंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण तापणार आहे.
राज्यात एकूण 45 हजार 276 सहकारी संस्थांची निवडणूक बाकी आहे. त्यापैकी क आणि ड वर्गातील 30 हजार 820 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाची तयारी सुरु आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका 4 वेळा पुढे ढकलल्या!
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 17 मार्चला पुन्हा 3 महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला. पुढे अजून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता नव्या वर्षात या निवडणुका पार पडतील.
प्राधिकरणाकडून पॅनल तयार
क आणि ड वर्गातील 30 हजार 820 सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडून 5 हजार 629 जणांचं पॅनल तयार करण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये तज्ज्ञ व्यक्ती, निवृत्त सरकारी अधिकारी, खासगी लेखापरीक्षक, वकील यांसारख्या मंडळींचा समावेश करण्यात आल्याची माहितीही प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
सहकारी संस्थांना दिलासा
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यातील सहकारी संस्थांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लेखा परीक्षणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च 2021 पर्यंत तर लेखा परीक्षण 31 डिसेंबर 2020 पर्यंत करता येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यासंदर्भात आदेश काढला होता.