सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक ,31 मार्च पर्यंत स्थगिती
covid-19 मुळे दोन वेळा तीन महिन्याची मुदतवाढ सहकारी संस्थांच्या निवडणुकीला देण्यात आली होती.
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक ,31 मार्च पर्यंत स्थगिती
covid-19 मुळे दोन वेळा तीन महिन्याची मुदतवाढ सहकारी संस्थांच्या निवडणुकीला देण्यात आली होती.
बारामती वार्तापत्र
मंगळवारी सहकारी संस्थांच्या निवडणुकी चे आदेश काढण्यात आले होते. मात्र परत या आदेशला ब्रेक लागला असून सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
covid-19 मुळे दोन वेळा तीन महिन्याची मुदतवाढ सहकारी संस्थांच्या निवडणुकीला देण्यात आली होती. त्याप्रमाणे 31 डिसेंबरला ही मुदत संपली व सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली व तसे आदेश पारित केले. मात्र हे आदेश पोहचून कारवाई सुरू होईपर्यंत पुन्हा एकदा या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था या निवडणूक टप्प्यात आल्या होत्या. यामध्ये सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, दूध संस्था, सहकारी बँक यांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र या आदेशाने सर्व काम थांबले आहे .
सहकारी कारखाने व सहकारी बँकेवर, दूध संस्थेवर प्रतिनिधी म्हणून जाण्याची अनेक जणांना इच्छा असते, त्याप्रमाणे अनेक इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावली होती. मात्र या आदेशामुळे त्यांच्या उत्साहावर पुन्हा पाणी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यामुळे उमेदवार तीन महिन्यासाठी नाराज झाले आहेत मात्र मार्च नंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे हे संभाव्य, इच्छुक उमेदवार पुन्हा एकदा आपले राजकीय वजन दाखविण्यास तयार होतील.