स्थानिक
साईकृपा सोसायटी च्या अध्यक्षपदी मोकाशी व उपाध्यक्ष पदी झगडे
सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध राहू
साईकृपा सोसायटी च्या अध्यक्षपदी मोकाशी व उपाध्यक्ष पदी झगडे
सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध राहू
बारामती वार्तापत्र
कटफळ येथील साईकृपा विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी माणिक मोकाशी व व्हाईस चेअरमन पदी दिलीप झगडे यांची व सर्व संचालक यांची पुढील पाच वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमवार ११ एप्रिल दादा मोकाशी,देविदास झगडे,दादारांम झगडे,हेमंत आटोळे,भारत मोकाशी,प्रकाश आटोळे,हौशीराम मोकाशी,बबन कांबळे,सुरेश लोखंडे,सौ कविता लोखंडे,सुनीता रांधवन यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टाकसाळे यांनी काम पाहिले सोसायटी च्या विकास साठी सर्वाना बरोबर घेऊन काम करू व सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध राहू असे निवडणुकीनंतर माणिक मोकाशी व दिलीप झगडे यांनी सांगितले या प्रसंगी कटफळ मधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्तीत होते