सातव चौक, बारामतीत ट्रॅफिकचा पंचनामा; सोशल मिडियावर जोरदार चर्चा, पोलिसांची कारवाई सुरू – मात्र नगरपरिषद अतिक्रमणावर गप्पच!
नगरपरिषद मात्र अतिक्रमणावर मौनव्रती!

सातव चौक, बारामतीत ट्रॅफिकचा पंचनामा; सोशल मिडियावर जोरदार चर्चा, पोलिसांची कारवाई सुरू – मात्र नगरपरिषद अतिक्रमणावर गप्पच!
नगरपरिषद मात्र अतिक्रमणावर मौनव्रती!
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील सातव चौक परिसरात सध्या तीव्र वाहतूक समस्या निर्माण झाली आहे.
अव्यवस्थित पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगली असून, संबंधित प्रशासनाची कार्यक्षमता आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिसांकडून बेशिस्त पार्किंगवर कारवाई
वाहतूक शाखेने अलीकडील काही दिवसांपासून चुकीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक वाहनांची बेफाम पार्किंग ही वाहतुकीच्या अडथळ्याचे मुख्य कारण ठरत आहे. काही ठिकाणी ‘नो पार्किंग’ झोन असूनही वाहनं रस्त्यावर आडवी लावली जात आहेत, यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
नगरपरिषद मात्र अतिक्रमणावर मौनव्रती!
सातव चौक परिसरात सार्वजनिक जागांवर आणि काही प्रमाणात रस्त्यांवरही अतिक्रमण केल्याचे स्पष्टपणे दिसत असले तरी बारामती नगरपरिषदेने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
परिणामी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना व प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण होतो आहे.
सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया
स्थानिक नागरिक आणि तरुणांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून प्रशासनावर टीका सुरू केली आहे. अनेकांनी व्हिडिओ व फोटो पोस्ट करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांकडून दंड होतोय, पण मूळ कारण म्हणजे रस्त्यांवरील अतिक्रमण असून त्याबाबत नगरपरिषदेने ठोस कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.