लॉकडाऊन च्या काळात देखील बारामती मध्ये विधायक उपक्रमाद्वारे अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा.
जाहीर कार्यक्रम न घेता विधायक उपक्रम.

लॉकडाऊन च्या काळात देखील बारामती मध्ये विधायक उपक्रमाद्वारे अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा.
बारामती -:वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचा आज वाढदिवस लोॅकडउन चा काळ असल्यामुळे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात शांतता परंतु अशा परिस्थितीत देखील बारामती शहरांमध्ये आज बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष सौ.तरन्नूम सय्यद व मुस्लिम बॅँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी कुठलाही जाहीर कार्यक्रम न घेता विधायक उपक्रम हाती घेऊन दादांचा वाढदिवस साजरा केला.
आज सकाळी बारामती शहरातील बाल निरीक्षण गृह (रिमांड होम) येथील सर्व विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले .सदरील कार्यक्रम बारामतीचे माजी नगराध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक योगेश भैय्या जगताप व बारामती सहकारी बँकेचे संचालक व बाल निरीक्षण गृहाचे सदस्य ॲड. शिरीष कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना दादांना दीर्घायुष्य लाभावे अशी मनोकामना योगेश जगताप यांनी केली बाल निरीक्षणगृहां मध्ये यावेळी पत्रकार तैनूरभाई शेख बारामती आम मुस्लिम युथ फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान पठाण उद्योजक सुरेश खत्री शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरुद्दिन सय्यद ,आकलाज सय्यद ,हारून (राजू) शेख ,सुभान कुरेशी, आसिफ झारी, सलीम तांबोळी सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर बाल निरीक्षण गृहातील मुलांना अन्नदान करण्यात आले.मुलांनी देखील आजआपल्या लाडक्या नेत्याला फुलांची रांगोळी काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला
!! कार्यक्रम क्रमांक दोन!!जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटून अजितदादांचा वाढदिवस साजरा
बारामती -: सकाळी अन्नदानाचा कार्यक्रम पार पडल्या नंतर दुपारी चार वाजता एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था गुणवडी रोड या ठिकाणी गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटून अजितदादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या किटमध्ये पाच किलो गहू ,पाच किलो तांदूळ, अर्धा किलो पोहे ,अर्धा किलो शेंगदाणे, चहा पावडर ,साखर एक किलो,तेल एक लिटर व तूर डाळ एक किलो इत्यादींचे वस्तूंचे बॉक्स पॅकिंग करूनवाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रम बारामती नगरीचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नवनाथ बल्लाळ, नगरसेवक सत्यव्रत काळे ,नगरसेविका रुपाली गायकवाड ,नगरसेविका ज्योतीताई सरोदे व कार्यक्रमाचे आयोजक नगरीच्या उपनगराध्यक्षा सौ तरन्नुम सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नवनाथ बल्लाळ यांनी दादांच्या वादळी कार्याचा आढावा घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरुद्दीन सय्यद यांनी दादांच्या जुन्या आठवणी सांगून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी दादांनी नेहमीच सर्व जाती धर्मातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत असल्याचे सांगून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते केक कापण्यात आला. आलेल्या सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग चौधर ,दीपक गायकवाड ,भारत सरोदे तसेच सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.