सारी च्या रुग्नासाठी अतिदक्षता विभाग आवश्यक: नागरिकांची मागणी.
सारी रुग्ण संशयित संख्या वाढतेय.
सारी च्या रुग्नासाठी अतिदक्षता विभाग आवश्यक: नागरिकांची मागणी.
सारी रुग्ण संशयित संख्या वाढतेय.
बारामती :वार्तापत्र
बारामती तालुक्यात सारी रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
बारामतीला आता सारीच्या रूग्णांसाठी अतिदक्षता विभागाची गरज असल्याचे नागरिकांची मागणी आहे .
दरम्यान बारामतीत आता सारीच्या संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभागाची आवश्यकता आहे, त्यासाठी प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसात आढळून येत असलेल्या कोरोना संशयित रूग्णांमध्ये कोरोना निगेटिव्ह आढळणाऱ्यांचीही संख्या दिसू लागली असून यामध्ये सारी चे संशयित रुग्ण आढळू लागले आहेत. सारीच्या संशयित रुग्णास कोरोना प्रमाणेच लक्षणे असली तरी कोरोनाची उपचार पद्धती करता येत नाही, तसेच कोरोना निगेटिव्ह असल्याने कोरोनाच्या अतिदक्षता विभागात ठेवून त्याच्यावर उपचार करता येत नाही, त्यामुळे सारी चे रूग्ण स्वतंत्र ठेवण्यासाठी आता नव्याने स्वतंत्र अतिदक्षता विभाग किंवा सारी चा अतिदक्षता सेंटर उभारण्याची गरज आहे.
दरम्यान या संदर्भात नाव न छापण्याच्या अटीवर काही वैद्यकीय तज्ञांनी ही गरज आता दिवसेंदिवस अधिक भासू लागली असून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.