सावकारकी प्रकरणी चार जणाच्या विरोधात बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा
25 लाख रुपयांची फसवणूक केली
सावकारकी प्रकरणी चार जणाच्या विरोधात बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा
25 लाख रुपयांची फसवणूक केली
क्राईम;बारामती वार्तापत्र
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात काल दिनांक ११\६\२०२२ दाखल झालेल्या गुन्ह्यात सुमित सुधाकर धर्माधिकारी (रा सुपा ता बारामती जि पुणे), 2) राजेंद्र साहेबराव जगताप (रा खंडुखैरेवाडी ता बारामती जि पुणे) 3) झुंजार पुंडलिक चांदगुडे (रा दापोडी चौफुला ता.दौंड जि पुणे) व 4) आप्पसाहेब विश्वास शिंदे (रा अंतवाडी ता कराड जि सातारा) या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जमिनीवर पतसंस्थेकडून ३४ लाख रुपयांचे कर्ज व्याजाने दिलेल्या २५ लाखांच्या बदल्यात ५ एकर जमिन गहाणखताने देण्याचे ठरले असताना प्रत्यक्षात या जमिनीचे खरेदीखत करून घेत फसवणूक करण्यात आली.
शिवाय २५ लाख रुपयांचे व्याज उकळत तीच जमीन पतसंस्थेकडे तारण ठेवत त्यावर ३४ लाखाचे कर्ज घेण्यात आले. याप्रकरणी चौघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारकी अधिनियमासह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमिता सुधाकर धर्माधिकारी (रा. सुपे, ता. बारामती) यांच्यासह राजेंद्र साहेबराव जगताप (रा. खंडूखैरेवाडी, ता. बारामती), झुंजार पुंडलिक चांदगुडे (रा. दापोडी चौफुला, ता. दौंड) आणि अप्पासाहेब विश्वास शिंदे (रा. अंतवाडी, ता. कराड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सुपे येथील रेखा चंद्रकांत चांदगुडे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार २३ मार्च २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत सुपे येथे ही घटना घडली. फिर्यादी यांचा मुलगा सुधीर यास धर्माधिकारी याने भागीदारात सराफी दुकान टाकू, असे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात फिर्यादीची पानसरेवाडी गावच्या हद्दीतील जमीन गट क्रमांक ३४५ मधील पाच एकर क्षेत्र जगताप यांच्यामार्फत चांदगुडे व शिंदे यांना 25 लाखापेक्षा जास्त व्याज देऊनही त्यांनी पैसे द्या,.
नाहीतर तुमचेकडे बघुन घेईन अशी धमकी दिली. व फिर्यादीची घेतलेली 5 एकर जमिन परत न देता सदर जमिनीवर पतसंस्थेकडुन 34 लाख रूपयाचे कर्ज घेऊन फिर्यादीची जमिन परत न देता त्यांनी फसवणुक केली.
यावरून पोलिसांकडे रेखा चांदगुडे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार शेलार हे करीत आहेत.