सावधान! कोरोना पॉझिटिव्ह वाटचाल पन्नाशी कडे,,, अजुनही वेळ गेली नाही
ग्रामीण भागात संख्या वाढलेलीच
सावधान! कोरोना पॉझिटिव्ह वाटचाल पन्नाशी कडे,,, अजुनही वेळ गेली नाही
ग्रामीण भागात संख्या वाढलेलीच
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या ४२ झाली आहे.
शासकीय rt-pcr २०० नमुन्यामधून २० रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण २८ rt-pcr रुग्णांपैकी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या २८ नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह ११ रुग्ण आहेत.
शहरातील १९ तर ग्रामीण भागातील २३ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पारवडी येथील ५३ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय युवक, पाहुणेवाडी येथील ५८ वर्षीय महिला, माळेगाव येथील आठ वर्षीय मुलगा, सोनगाव येथील ३१ वर्षीय पुरुष, निरावागज येथील १६ वर्षीय युवती, ३६ वर्षीय महिला, २२ वर्षीय महिला, होळ येथील ५० वर्षीय महिला, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारील ४० वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ४२ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, सावळ येथील ४२ वर्षीय महिला, काटेवाडी येथील सहा वर्षीय मुलगा, लोणी भापकर येथील २६ वर्षीय महिला, सावळ येथील सोळा वर्षीय युवक, बारामती शहरातील २२ वर्षीय पुरुष, शिरवली येथील ६० वर्षीय महिला, पाटस रोड येथील २५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तपोवन कॉलनी घारे इस्टेट येथील ६० वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष, पिंपळी येथील २२ वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील जिल्हा परिषद शाळेशेजारील ५२ वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील ८४ वर्षीय पुरुष, निरावागज भोसले वस्ती येथील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या ६६४१आहे तर बरे झालेले रुग्ण ६२७९ व एकूण मृत्यु १४५ इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा