सावधान ! तुम्हाला आलेला फोन टोल फ्री नंबरच आहे का? खात्री करा अन्यथा होऊ शकते फसवणूक
गुन्हेगारांचा नवीन फंडा
सावधान ! तुम्हाला आलेला फोन टोल फ्री नंबरच आहे का? खात्री कराअन्यथा होऊ शकते फसवणूक
गुन्हेगारांचा नवीन फंडा
बारामती वार्तापत्र
तुमच्या फोनवर आलेला फोन हा एखाद्या कंपनीचा किंवा बँकेचा टोल फ्री नंबर आहे का याची अगोदर खात्री करा. अन्यथा छोट्याश्या दुर्लक्षामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. याविषयी रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकांच्या टोल फ्री नंबर सारख्या नंबरशी मिळतेजुळते असणाऱ्या नंबरमुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात सेन्ट्रल सायबर सेक्युरिटी अँड रिस्क डिपार्टमेंट,आरबीआय च्या संकेतस्थळावर याविषयीच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
सायबर गुन्हेगार हे बँकांच्या टोल फ्री क्रमांका प्रमाणे नंबर वापरून लोकांची फसवणूक करतात. उदाहरणार्थ 1800 123 1234 ( अंदाजे नं ) अशा प्रकारचा एखादा टोल फ्री नंबर असू शकतो. मात्र याच नंबरला मिळता-जुळता( 800 123 1234) असा नंबर घेऊन या नंबर वरून बँकेच्या ग्राहकांना फोन केला जातो व बँकेच्या कस्टमर केअर किंवा बँकेतून बोलत असल्याचे भासवून ग्राहकांकडून गोपनीय माहिती घेतली जाते.
ग्राहकही मग अशी माहिती टोल फ्री नंबर वरून आल्यामुळे बँकेचा नंबर असेल असे समजून आपली गोपनीय माहिती सायबर गुन्हेगाराला देतात. मात्र या सर्व प्रकारामुळे ग्राहकाचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी यापुढे काळजी घेऊन टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये व आपले आर्थिक व्यवहार करावेत आणि बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्यावे.