सावळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सुनीता दत्तात्रय आवाळे
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळामध्ये पोहोचवू
सावळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सुनीता दत्तात्रय आवाळे
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळामध्ये पोहोचवू
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सावळ ग्रामपंचायत सरपंच पदी सौ सुनीता दत्तात्रय आवाळे यांची बिनविरोध निवड सोमवार दि.०९ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे.
या प्रसंगी उपसरपंच नितीन भिसे, सदस्या ज्योती दीपक आवाळे, रोहिणी रमेश खोमणे, सारिका धनंजय आटोळे, अंजली पोपट आवाळे, तृप्ती जितेंद्र विरकर, फक्कड तुकाराम बालगुडे, चेतन तात्याराम आटोळे आदी मान्यवर उपस्तीत होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काटेवाडी चे मंडल अधिकारी राजेंद्र गिरमे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक राहुल सरक यांनी काम पाहिले.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळामध्ये पोहोचवू व नागरिकांच्या विकासासाठी सावळ ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे असे विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच सुनीता दत्तात्रय आवाळे यांनी सांगितले.