सावित्री ज्योती पुरस्कार वितरण समारंभ
'होय मी सावित्री फुले बोलतेय'
सावित्री ज्योती पुरस्कार वितरण समारंभ
‘होय मी सावित्री फुले बोलतेय’
बारामती वार्तापत्र
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळ व सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १६ एप्रिल २२ रोजी विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या महिलांचा गौरव सावित्रीज्योती पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.
हा समारंभ शनिवार दि १६ एप्रिल २०२२ रोजी दुपारी 3.30 वाजता महात्मा फुले कार्यालय, पाटस रोड, बारामती येथे होणार आहे
या निमित्त प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ढाकुलकर, अमरावती यांचा ‘होय मी सावित्री फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ बारामती शहर व तालुक्यातील सर्व महिलानी घ्यावा असे आवाहन सावित्रीबाई फुले मंडळाच्या विश्वस्त सौ वनिताताई बनकर व कमलताई हिंगणे यांनी केले आहे