इंदापूर

भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीच्या नोटिसाही त्याबरोबर येतात-रुपाली चाकणकर

इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना भाजपावर केली टीका

भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीच्या नोटिसाही त्याबरोबर येतात-रुपाली चाकणकर

इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना भाजपावर केली टीका

इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर या सुनिश्चित पंढरपूर दौऱ्यावर असता त्यांनी इंदापुरातील सावतामाळी नगर येथील नगरसेवक पोपट शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानावर बोलताना चाकणकर म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांना ईडीच्या नोटिसा येत नाहीत.ईडीच्या नोटीस ह्या केवळ राजकीय हेतूनेच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याबरोबर येतात आणि विशेष म्हणजे या नोटिसा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अथवा नेत्यांना येत नाही.त्यामुळे या मागे किती मोठे राजकारण आहे.हे सर्वसामान्य लोकांना समझते.असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपावर केला.

Back to top button