स्थानिक

बारामतीत राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी

बारामतीत राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे समतेचे प्रणेते,आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे आणि शुभम अहिवळे यांनी मनोगत व्यक्त करत असताना शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत समाजातील दुर्बल,वंचित घटकांसाठी त्यांनी उभारलेल्या न्यायसंगत धोरणांवर प्रकाश टाकला.

दरम्यान,याप्रसंगी गौतम शिंदे,ॲड.सुशिल अहिवळे,भुषण ढवाण,नितीन शिंदे,सिध्दार्थ लोंढे,सोमनाथ रणदिवे,राहुल कांबळे,नितीन गव्हाळे,चंद्रकांत भोसले,नितीन सोनवणे,दिपक अहिवळे,रितेश गायकवाड,शांताराम सोनवणे,आकाश शेलार,प्रशांत गावडे,विशाल घोडक व आदी उपस्थित होते.

Back to top button