सिल्वर ओक वरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी
सिल्वर ओक वरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी
इंदापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी (दि.९) राष्ट्रवादी भवन ते तहसीलदार कचेरी असा निषेध मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.८) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी करत आत शिरत थेट दगडफेक आणि चप्पल फेक केली. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर इंदापूर येथे काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्येकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विरोधात विविध घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी प्रतापराव पाटील, मधुकर भरणे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, प्रशांत पाटील,बापूसाहेब शेंडे, अतुल झगडे,संजय सोनवणे,सागर मिसाळ, नवनाथ रुपनवर,महारुद्र पाटील,वसंत आरडे,सचिन खामगळ, विठ्ठल ननवरे,बाळासाहेब करगळ,पोपट शिंदे, रमेश शिंदे, श्रीधर बाब्रस,धनंजय बाब्रस,ॲड.शुभम निंबाळकर, सागर पवार, वसीम बागवान, उमा इंगुले, स्मिता पवार, उज्वला चौगुले यांसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांकडे देण्यात आले.