सिल्व्हर ओक हल्ला : हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी
सिल्व्हर ओक हल्ला : हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी
बारामती वार्तापत्र
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करणारे आंदोलक शुक्रवारी अचानक आक्रमक झाले. आक्रमक आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दगड आणि चपला फेकत भ्याड हल्ला केला. याप्रकरणी आता संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत आहेत. त्यातच आता बारामतीकर चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.
आज महाविकास आघाडीच्या वतीने बारामती येथे आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात महाविकास आघाडीच्या शेकडो
महिला, पुरुष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काहींनी १२ एप्रिलला बारामतीत गोविंदबाग येथे येत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या दिवशी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता गोविंदबाग येथे थांबेल, आंदोलकांना जशास तसे उत्तर देवू असा इशारा तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिला. १२ एप्रिलला कोणी बाहेरच्या व्यक्तीने येवून काही करण्याचा प्रयत्न केला तर आता ज्येष्ठांनी आम्हाला अडवू नये. त्या दिवशी ज्येष्ठांनी घरात बसावे, परंतु आम्हाला प्रत्युत्तर देवू द्या. केवळ निषेध सभा घेवून उपयोग नाही, सोशल मीडियासह सर्व क्षेत्रात पक्षाची भूमिका आता ठामपणे मांडावी लागेल, असे मत युवक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
तसेच या भ्याड हल्ल्या मागे एडवोकेट गुणरत्न सदावर्ते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपचे षड्यंत्र असल्याच्या भावना व्यक्त करून त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच या पुढील काळात पवार साहेबांना बदनाम करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
सदर निषेधाचे पत्र बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना देण्यात आले.
तसेच या घटनेच्या पाठीमागील खरा मास्टरमाईंड कोण आहे, आणि हे कट कारस्थान कोणी रचलं आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा. तसेच या एसटी कर्मचारी आंदोलनाला मुठ-माती देणाऱ्यांच्या विरोधात देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली.
यावेळी संभाजी होळकर, पौर्णिमा तावरे, इम्तियाज शिकीलकर, वनिता बनकर, नितीन शेंडे, सुभाष ढोले, धीरज लालबिगे, शब्बीर शेख, आशिष जगताप, अनिल लडकत, तानाजी कोळेकर, सतीश देशमुख, नरेंद्र गुजराथी, दिलीप ढवाण पाटील, अविनाश गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, संतोष जाधव, नवनाथ बल्लाळ, कॉंग्रेसचे अँड. अशोक इंगुले व वैभव बुरुंगले तसेच शिवसेनेचे विश्वास मांढरे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.