इंदापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ताई – दादा सप्ताहाचा शुभारंभ ..,
ना.भरणेमामा यांनी कोविड योध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त...

इंदापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ताई – दादा सप्ताहाचा शुभारंभ ..,
ना.भरणेमामा यांनी कोविड योध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त…
निलेश भोंग; बारामती वार्तापत्र
ताई – दादा सप्ताह अंतर्गत आज जंक्शन येथे कोविड योद्धे डॉक्टर्स नर्सेस व पोलीस यांचा सत्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना .अजितदादा पवार व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सप्ताह तालुक्यात राबविण्यात येत आहे.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील कोरोना काळात डॉक्टर्स नर्सेस व पोलीस यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, राजकुमार भोसले, रुद्रसेन पाटील, सचिन सपकाळ, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, अक्षय कोकाटे, सुमित यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस अक्षय भोसले यांनी केले होते.
इंदापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ताई – दादा सप्ताहाचा शुभारंभ ..,
ना भरणेमामा यांनी कोविड योध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त…