सीबीआयने येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक
कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत.
सीबीआयने येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक
कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत.
पुणे,प्रतिनिधी
सीबीआयने येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक केली आहे. याआधी सीबीआयने मुंबई आणि पुण्यात छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. सीबीआयने शनिवारी अविनाश भोसले, शाहीद बलवा आणि विनोद गोएंका यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर कारवाई केली होती. आज अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. याशिवाय अविनाश भोसले हे शरद पवार यांच्या जवळच्या लोकांपैकी असल्याचं सांगितलं जात आहे. या वृत्तामुळे पवारांना मोठा झटका बसू शकतो.
आज सकाळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला आधीच जबर धक्का बसला आहे.
गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
कोण आहे अविनाश भोसले? –
रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहे. कोट्यवधी रुपयांच्या एबीआयल ग्रुपचे सर्वेसर्वा भोसले आहे. अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. पुण्यात रोजगारच्या ते शोधात स्थलांतर झाले होते. सुरुवातीला रिक्षा चालक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर रिक्षा भाड्याने द्यायचा व्यवसाय केला सुरू केला. मग पाहता पाहता बांधकाम क्षेत्र आणि राज्याच्या बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून लहान मोठी कंत्राटी काम मिळवली. १९९५ ला सेना-भाजप युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची काम मिळवले होते. भोसले यांचा सर्वच पक्षातील राजकीय व्यक्तींशी जवळीक आहे.