सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोबाईल चोरटा जेरबंद
महिलेवर चाकू हल्ला करणारा इसम सुद्धा सीसीटीव्हीत कैद झालेला आहे

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोबाईल चोरटा जेरबंद
महिलेवर चाकू हल्ला करणारा इसम सुद्धा सीसीटीव्हीत कैद झालेला आहे
क्राईम;बारामती वार्तापत्र
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोबाईल चोरट्याला जेरबंद करण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले. या प्रकरणी निलेश तुकाराम गोसावी (वय ४० वर्ष) (रा: भैरोबा मंदिर तांदुळवाडी तालुका बारामती) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सॅमसंग ए १२ कंपनीचा मोबाइल चार्जिंगला लावलेला असताना माने टायर वर्क पंतगशाहा नगर रिंग रोड या ठिकाणावरून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत बारामती पोलीस शहर ठाण्यात गुन्हा नंबर ३४/ २२ कलम ३७९ भा.द.वी प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सदर चोरट्यास पकडण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही पाहणी केली असता चोरटा दिसून आला .
त्यानंतर पथकांच्या खबरी मार्फत त्याची ओळख पटवण्यात आली त्याचे नाव निलेश तुकाराम गोसावी (वय ४० वर्ष) (रा: भैरोबा मंदिर तांदुळवाडी तालुका बारामती) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलीस ठाण्यात आणताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व मुद्देमाल ही काढून दिला सदर आरोपीने आणखी काही मोबाईल चोरले आहे का याबाबत पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस अंमलदार तुषार चव्हाण, शिंदे, अभिजीत कांबळे, दशरथ कोळेकर, कोठे हे तपास करत आहेत.
यापुढे सर्व व्यापारी वर्गाने आपापल्या दुकानासमोर रोडवर जर सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर गुन्ह्याची उकल होण्यास निश्चित मदत होईल. पोलीस आपल्याकडे सीसीटीव्ही पाहण्यास येथील एवढा त्रास जर सोडला तर सर्व व्यापारी व रहिवासी हे कित्येक पटीने सुरक्षित होतील. कारण सीसीटीव्ही मुळे निश्चित चोरी मध्ये घट होईल. महिलेवर चाकू हल्ला करणारा इसम सुद्धा सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. परंतु त्याची ओळख अद्याप पटलेली नाही परंतु निश्चितपणे काही दिवसातच तोही गजाआड झालेला असेल. तरी सर्वांनी सुरक्षेच्या कारणासाठी सीसीटीव्ही आपापल्या दुकानांना शक्य असल्यास सोसायटीच्या बाहेर मेन गेटवर बसवावे असे आव्हान पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे