सी.ओ.ई.पी., पुणे १९८५ च्या माजी विद्यार्थ्यांची अनेकान्त संकुलास भेट
९० माजी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित
सी.ओ.ई.पी., पुणे १९८५ च्या माजी विद्यार्थ्यांची अनेकान्त संकुलास भेट
९० माजी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित
बारामती वार्तापत्र
२ फेब्रुवारी २०२५ रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये सी.ओ.ई.पी., पुणे येथून १९८५ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास आवर्जून भेट दिली. उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवेतून निवृत्त झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला.
माजी विद्यार्थ्यांचे भेटीचे आयोजन अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव व सी.ओ.ई.पी.चे माजी विद्यार्थी मिलिंद शाह वाघोलीकर यांनी केले.
सर्वांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी केले. याप्रसंगी त्यांनी या विद्यार्थ्यांपुढे महाविद्यालयाने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा आलेख मांडला.
संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगती वेगाने होत आहे असे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी सीओईपी, पुणेचे ९० माजी विद्यार्थी सहभागी होते यामध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे काही माजी विद्यार्थी सहभागी होते. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर, स्वच्छता, अद्ययावत कार्यालय, अद्ययावत सोई सुविधांयुक्त इमारती, संशोधन, प्रयोगशाळा, वृक्षसंपदा, निसर्गरम्य परिसर, महाविद्यालयास मिळालेले अनेक पुरस्कार इ. बाबत समाधान व्यक्त केले व अभिमान व्यक्त केला व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास भविष्यात विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होईल असे गौरवोद्गार काढले.
तु.च.महाविद्यालयाबरोबरच अनेकान्त मॅनेजमेंट ऑफ स्टडीज, अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कुल, कॉलेज ऑफ फार्मसी इ. ना माजी विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.
त्याचबरोबर केव्हीके, सेंटर फॉर एक्सलन्स येथे देखील त्यांनी भेट दिली. या दोन दिवसीय माजी विद्यार्थी मेळाव्याचे नियोजन संस्थेचे सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, सुरेन हिरे व प्रदीप कडू यांनी केले. ९० माजी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी शुभेच्छा दिल्या.