इंदापूर

सुनिश्चित उद्घाटना अगोदरच शिवसेनेकडून इंदापूरच्या नूतन नगरपरिषद इमारतीचे उद्घाटन

शिवसेनेला डावललं जात असल्याचा आरोप

सुनिश्चित उद्घाटना अगोदरच शिवसेनेकडून इंदापूरच्या नूतन नगरपरिषद इमारतीचे उद्घाटन

शिवसेनेला डावललं जात असल्याचा आरोप

इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कोनशिलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या सुनिश्चित कार्यक्रमा अगोदरच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्घाटन करत विविध घोषणाबाजी केली.

राज्यात महविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेला विश्वासात घेतले जात नाही त्याच बरोबर कोणत्याही कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जात नाही त्यामुळे आम्ही उद्घाटन करत असल्याचे यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष मेजर महादेव सोमवंशी यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शिवसेना नेते विशाल बोंद्रे म्हणाले की,ही उद्घाटने होत असताना कोणत्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला सांगितले जात नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सही शिवाय एक ही रुपया दिला जात नाही.या ठिकाणी कोट्यावधी रुपये आणले जातात.राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत तरी देखील त्यांचा व मुख्यमंत्र्यांचा फोटो कुठेही नाही.राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र असताना जर इंदापूर तालुक्यात काही नेते मंडळी असे राजकारण करत असतील तर शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो व इथून पुढे देखील शिवसेना अशाच प्रकारे उद्घाटने करेल असा इशारा विशाल बोंद्रे यांनी यावेळी दिला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीने करोडो रुपये तालुक्यासाठी आले परंतु मागील दोन वर्षांमध्ये एकाही कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकला जात नाही ही अपमानास्पद गोष्ट असून वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी असे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button