सुनील सस्ते यांच्या प्रभात फेरीचा शुभारंभ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्या हस्ते संपन्न
प्रभात फेरीची सुरुवात ताशांच्या गजरात झाली.

सुनील सस्ते यांच्या प्रभात फेरीचा शुभारंभ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्या हस्ते संपन्न
प्रभात फेरीची सुरुवात ताशांच्या गजरात झाली.
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचाराला वेग येत असून, अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील दादासाहेब सस्ते यांच्या प्रभात फेरीचा शुभारंभ रविवारी सिद्धेश्वर गल्ली येथील श्री गणेश मंदिरामध्ये विधीवत करण्यात आला.
या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सदाशिव सातव यांच्या उपस्थिती करण्यात आला.
प्रभात फेरीची सुरुवात ताशांच्या गजरात झाली. खरात वस्ती येथील कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण स्वागत करत प्रचारयात्रेची रंगत वाढवली. स्थानिक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला असून, परिसरात निवडणूक प्रचाराचे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
सिद्धेश्वर गल्ली प्रभागात गेली अनेक वर्षे सुनील सस्ते यांना सातत्याने विजय मिळत आला आहे. आता आगामी निवडणुकीत ते सहाव्या वेळेस मैदानात उतरले असून, या प्रभात फेरीमुळे त्यांच्या प्रचाराला चांगली चालना मिळाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.






