टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते खंडोबा नगर येथे शिव भोजन थाळी चा शुभारंभ
गरीब व गरजूंना मिळणार आहार,सकाळी 11 ते तीन या वेळेत शिव भोजन सुरू राहणार

टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते खंडोबा नगर येथे शिव भोजन थाळी चा शुभारंभ
गरीब व गरजूंना मिळणार आहार,सकाळी 11 ते तीन या वेळेत शिव भोजन सुरू राहणार
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या महत्वपूर्ण योजनांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी योजना हि गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सुरु आहे.कोरणा सारख्या महामारीत सर्वसामान्य जनतेचे अन्नावाचून खूप हाल झाले असून या गरीब लोकांना अल्प दरात भोजन मिळण्याच्या हेतूने बारामती येथील खंडोबानगर मध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी माजी नगरसेविका सौ.वनिता बनकर यांच्या यांच्या प्रेरणेतून सोमवार दि.12 जुलै रोजी शिव भोजन थाळी सुरू करण्यात आली.
या भोजन थाळी चा शुभारंभ टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार यांच्या शुभाहस्ते करण्यात आला.
यावेळी नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा ,तावरे ,अध्यक्ष बारामती बँक श्रीकांत सिकची , सभापती पंचायत समिती निताताई फरांदे, गटनेते सचिन सातव, नगरसेविका सीमा चिंचकर,सुहासीनी सातव,
आरती शेंडगे,भाग्यश्री धायगुडे,धनवान वदक,कमल हिंगने, सगिता ढवाण, नूसरत इनामदार, दिपाली पवार, हेमलता निंबाळकर, मनिषा रासकर, सुमन साळोखे इत्यादि मान्यवर उपस्थीत होते.