सुपा पोलिसांची तत्पर कारवाई;अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुखरूप सुटका,दोन आरोपी जेरबंद
पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून 23 वर्षीय तरुणाचे अपहरण

सुपा पोलिसांची तत्पर कारवाई;अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुखरूप सुटका,दोन आरोपी जेरबंद
पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून 23 वर्षीय तरुणाचे अपहरण
सुपा;प्रतिनिधि
एखाद्या चित्रपटात दाखवतात तला अपहरणाचा थरार बारामतीत झाला. बारामतीत दोन जणांनी मिळून एका तरुणाला गोड बोलून हॉटेलजवळ बसवलं. तिथे त्याला जबरदस्ती कारमध्ये बसवलं.
यानंतर आरोपींनी त्याला मारहाण करत चाकूनेदेखील भोसकण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी तरुणाचे अपहरण केले. त्याला मारहाण केलं. पण या गदारोळात आरोपींच्या तावडीतून पळून जाण्यात तरुण यशस्वी झाला आणि त्याने मित्राकडे मदत मागितली. यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या घटनेची सध्या बारामतीत चर्चा होत आहे.
पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून 23 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कता, तांत्रिक तपास आणि दिवेघाटातील थरारक पाठलागामुळे अपहरण झालेल्या युवकाची सुखरूप सुटका करण्यात यश आले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पीडित महिलेला नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणातील तरुणाची सुदैवाने सुखरुप सुटका करण्यात आली आहे. ओंकार प्रकाश भोसले (वय २७) आणि तन्मय सुधीर साळुंखे (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोंपीची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शनिवारी (६ जून) सायंकाळी ऋषिकेश याला सुपा-मोरगाव मार्गावरील चतुर्थी हॉटेल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर फॉरेस्ट गेट परिसरात त्याला पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवून पुण्याच्या दिशेने नेले. प्रवासादरम्यान आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकविताना चाकू त्याच्या डाव्या भुवईजवळ लागल्याने तो जखमी झाला. पुढे दिवेघाटाच्या पायथ्याशी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली. मात्र, अंधाराचा फायदा घेत ऋषिकेशने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत मित्रांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला.
दरम्यान, अपहरणाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले. जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या. मोबाईल कॉलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर संशयितांचे लोकेशन दिवेघाट परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग सुरू करून सासवड पोलिसांच्या मदतीने झेंडेवाडी येथे संशयितांची स्विफ्ट कार अडवली.
या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार भोसले आणि तन्मय साळुंखे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहेत.

