सुप्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांना कोरोनाची लागण पुण्यातील रुग्णालयात दाखल
10 दिवसांनंतर प्रकृती आता पूर्वीपेक्षा स्थिर
सुप्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांना कोरोनाची लागण पुण्यातील रुग्णालयात दाखल
10 दिवसांनंतर प्रकृती आता पूर्वीपेक्षा स्थिर
पुणे :प्रतिनिधी
सुप्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांना कोरोनामुळे 30 जानेवारी रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी असल्याचे सांगण्यात येत आहे. अमोल पालेकर यांना कोरोनाची तीव्र लक्षणे असून, तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती एबीपी न्यूजला एका सूत्राद्वारे मिळाली आहे.
अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे. 10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर उपचार सुरु होत असून आता काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नसल्याचं अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले यांनी म्हटलंय. अमोल पालेकर यांना अतिधुम्रपान केल्यामुळे त्रास झाला होता. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर 10 दिवसांनंतर अमोल पालेकर यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा स्थिर आणि चांगली आहे. अशा परिस्थितीत त्यांना व्हेंटिलेटरवरून काढून आता सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.
मराठीतच नव्हे तर हिंदीतही काम!
अमोल पालेकर यांनी 70 आणि 80 च्या दशकात एक काळ गाजवलेला होता. मराठीसोबतच अमोल पालेकर यांनी हिंदी सिनेसृष्टीतही केलेलं कामाची आजही अनेकजण आठवण काढतात. फक्त विनोदी भूमिकाच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ताकदीनं साकारणारा अभिनेता म्हणून अमोल पालेकर यांच्या पाहिलं जातं. एक उमदे चित्रकार असणाऱ्या अमोल पालेकर यांनी सिनेसृष्टीतत येण्याआदी एका बँकेत नोकरी केली होती. बँक ऑफ इंडियात अमोल पालेकर क्लार्क म्हणून काम करायचे.