सुप्रियाताई होणार का महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री?
सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शरद पवार यांचं मोठं विधान.. म्हणाले..
सुप्रियाताई होणार का महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री?
सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शरद पवार यांचं मोठं विधान.. म्हणाले..
मुंबई ;बारामती वार्तापत्र
सुप्रिया ताई सुळे ,अजितदादा पवार यांच्याविषयी माध्यमांनी पवार साहेबांना विचारलेल्या प्रश्नांना नेहमीच महत्त्व प्राप्त होते.
पवार साहेबांनी दैनिक लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतित सुप्रिया ताई या पहिल्या मराठा मुख्यमंत्री होणार का याविषयी विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांना देश पातळीवरच काम करण्याची आवड आहे त्याप्रमाणे ते राष्ट्रीय राजकारणात राहतील त्याचबरोबर राज्यात अनेक योग्य व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी आहेत त्यात अजितदादांचं नाव घ्यायलाही ते विसरले नाहीत नुकताच भाजपचे आशिष शेलार यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तुत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचाही 100% समर्थन आहे शरद पवार हे मोठ्या मनाचे नेते आहेत असे सूचक विधान केले होते त्यामुळे राज्यातील राजकारणात सुप्रियाताई येणार का अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र ही चर्चा राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडित असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं होतं मात्र सुप्रिया ताई मुख्यमंत्री होणार किंवा राज्यातील राजकारणात येणार याला आता पूर्णविराम मिळाला आहे.