सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवरील दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर पोस्ट केला फॅमिली छायाचित्र म्हणाल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया पार
सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवरील दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर पोस्ट केला फॅमिली छायाचित्र म्हणाल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया पार
मुंबई: बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दुसरी शस्त्रक्रिया पार पडली होती. यानंतर शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबूक अकाऊंटवरुन शरद पवार यांच्या सोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. या फोटोमध्ये संपूर्ण पवार कुटुंब दिसत आहे. शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार या देखील यावेळी उपस्थित होत्या.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे यांनी एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी ” आदरणीय शरद पवार साहेबांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरचा हा गुढीपाडवा. बाबा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना भेटण्यासाठी अजितदादा आणि सुनेत्रावहिनी आले. यानिमित्ताने आई, बाबा, दादा-वहिनी आणि आम्ही दोघे असे सर्वजण हॉस्पिटलमध्ये एकत्र आलो.”, असं म्हटलं आहे.
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नेहमीच्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करता येत नाही. पण कुटुंबीयांच्या सोबत आनंदाचे क्षण वाटून घेऊन आपणास या परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा मिळेल. गुढीपाडव्याचा हा सण आनंदाने साजरा करा.काळजी घ्या, सुरक्षित रहा!, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शरद पवार अजूनही रुग्णालयात
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया सोमवारी यशस्वीपणे पार पडली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते ब्रीच कँडी रुग्णालयात आहेत. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून ते अजूनही रुग्णालयात असल्याची माहिती दिली. शरद पवार शस्त्रक्रियेसाठी रविवारी संध्याकाळी हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या.
30 मार्चला पहिली शस्त्रक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांना 30 मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.