सुमारे 9 वर्षे पासून फरार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखे कडून जेरबंद
सदर आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी दौड पोलिस स्टेशनच्या ताब्यात

सुमारे 9 वर्षे पासून फरार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखे कडून जेरबंद
सदर आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी दौड पोलिस स्टेशनच्या ताब्यात
क्राईम ; बारामती वार्तापत्र
पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस पाहिजे फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक पुणे सोलापूर रोड वर पेट्रोलिंग करत असताना सदरच्या पथकास गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून इंदापूर येथील डिकसळ गाव फाट्याजवळ एक इसम संशयितरीत्या मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण प्रल्हाद काळे वय26 वर्षे रा डिकसळ ता इंदापूर असे सांगितले सदरच्या नावावरून पाहिजे फरारी यादीतील माहिती घेतली असता सदर आरोपी वर दौड पोलिस स्टेशन ला गु र नं 115/2012 भा द वी 380 सदरचा गुन्हा दि 8/6/2012 रोजी घडला होता वरील गुन्ह्यात सदरील आरोपी गुन्हा घडले पासून अद्याप पर्यत फरार होता . सदर आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी दौड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी श्री धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,पो उप निरीक्षक शिवाजी ननावरे
पो हवा रविराज कोकरे ,पो हवा अनिल काळे,पो ना अभिजित एकशिंगे,पो ना विजय कांचन,पो कॉ धिरज जाधव,पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.