सुवर्णयुग सहकारी पतसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निमगाव केतकी यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदत रवाना
मदत नव्हे कर्तव्य या उपक्रमा अंतर्गत पूरग्रस्तांसाठी मदत

सुवर्णयुग सहकारी पतसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निमगाव केतकी यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदत रवाना
मदत नव्हे कर्तव्य या उपक्रमा अंतर्गत पूरग्रस्तांसाठी मदत
निलेश भोंग प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीने धुमाकूळ घातला असून यात कोल्हापूर, सांगली, चिपळूण, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणे पुराने अक्षरशः थैमान घातले असून अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत पूरग्रस्तांना खाण्यापिण्याचे वांदे झाले असून घरा घरा मध्ये पाणी शिरल्याने त्यांचे अनोकात हाल चालू आहेत. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक संस्था राजकीय पक्ष तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून मदतीचा ओघ चालू आहे.
निमगाव केतकी येथील सुवर्णयुग सहकारी पतसंस्था व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निमगाव केतकी यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन दशरथ तात्या डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त “मदत नव्हे कर्तव्य” या अभियानांतर्गत कोकणातील पूरग्रस्तांसाठी किराणामाल खाद्यपदार्थ जीवनावश्यक वस्तूंचे हजाराहून अधिक किट राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच सचिन चांदणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.