सुशांतसिह मृत्य प्रकरणाचा तपास सी बी आयकडे ; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय.
त्याच्या मृत्यू प्रकरणी जे अन्य काही एफआयआर नोंद झाले आहेत त्याचाही तपास सीबीआयने करावा, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सुशांतसिह मृत्य प्रकरणाचा तपास सी बी आयकडे ; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय.
त्याच्या मृत्यू प्रकरणी जे अन्य काही एफआयआर नोंद झाले आहेत त्याचाही तपास सीबीआयने करावा, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला तपासात सहकार्य करावे, असेही सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
सुशांतसिंह प्रकरणी पाटणा येथे नोंद करण्यात आलेले एफआयआर योग्य आहे. त्याच्या मृत्यू प्रकरणी जे अन्य काही एफआयआर नोंद झाले आहेत त्याचाही तपास सीबीआयने करावा, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणे हा सुशांतच्या कुटुंबियांसाठी दिलासादायक बाब आहे, असे सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी म्हटले आहे.
सुशांतसिंहच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस बिहार सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. ही शिफारस स्वीकारल्याची माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली होती. सुशांतसिंह मृत्यूच्या मुद्द्यावरून बिहार आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आले होते. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
सुशांतची केस हाताळण्यात मुंबई पोलिस सक्षम असून सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची गरज नसल्याचा दावा महाराष्ट्र सरकारने केला होता. मात्र, अखेर हे प्रकरण सीबीआयकडे गेले आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर त्याच्या आतापर्यंतच्या सर्व आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक ऑडिटरकडून तपासणी करण्यात आली आहे. त्याचा एक अहवाल सोमवारी वांद्रे पोलिसांना सादर करण्यात आला. सुशांतच्या बँक खात्यातून आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.