सेव्ह द चिल्ड्रन्स या संस्थेकडून रथाद्वारे जनजागृतीचा समाज पूरक उपक्रम
कोरोनाची तिसरी लाट वेळीच थोपवण्यासाठी मदत करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आवाहन

सेव्ह द चिल्ड्रन्स या संस्थेकडून रथाद्वारे जनजागृतीचा समाज पूरक उपक्रम
कोरोनाची तिसरी लाट वेळीच थोपवण्यासाठी मदत करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आवाहन
इंदापूर : प्रतिनिधी
ध्वनीमुद्रीत ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून एका रथाद्वारे इंदापूर शहरात आणि तालुक्यात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या रथाच्या माध्यमातून नागरिकांना ज्या सूचना दिल्या जातील याचे तंतोतंत पालन करून कोरोनाची तिसरी लाट वेळीच थोपवण्यासाठी मदत करा असे आवाहन इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सेव्ह द चिल्ड्रन्स या संस्थेने हा समाज पूरक उपक्रम राबवला असून मंगळवारी दि.06 जुलै रोजी या जनजागृती अभियानाचा इंदापूर शहरात शुभारंभ करण्यात आला.पुढे सात दिवस या रथाव्दारे संपूर्ण तालुक्यात ध्वनीमुद्रीत ऑडिओ क्लिपव्दारे पालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
विजयकुमार परीट म्हणाले,की तालुका कोरोना संकटात असताना सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून वेळोवेळी मदत झाली यामध्ये प्रामुख्याने सॅनिटायझर,मास्क,ऑक्सीजन काॅन्सेंटेटर, पी.पी.ई कीट, व्हेंटिलेटर याचा पुरवठा करण्यात आला असून यामुळेच आपण तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झालेलो आहोत.आज आपण कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतून सावरतो ना तोच तिसऱ्या लाटेचा धोका समोर उभा आहे. इंदापूर तालुक्यातील मागील चार ते पाच दिवसाचे आकडेवाडी पाहिली तर पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसतो आहे. कदाचित ही तिसऱ्या लाटेची चाहूल असावी. अशावेळी जनतेमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, यासाठी सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून जनजागृती रथाद्वारे एक मोहीम हाती घेण्यात आली आहे.या कौतुकास्पद उपक्रमा बद्दल सेव्ह द चिल्ड्रन्स संस्थेच्या वरीष्ठ व्यवस्थापक इप्सिता दास,संस्थेचे समन्वयक हनुमंत पवार,अजित मालुंजकर यांचे प्रशासनाच्या वतीने मी आभार मानतो असे विजयकुमार परीट म्हणाले आहेत.यावेळी गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे ही उपस्थित होते.