सोनगाव चे मेजर नितीन ताटे सेवेतून निवृत्त
गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत
बारामती वार्तापत्र
खरेतर तरूणांना सैन्यदलात भरती होण्याची खूप इच्छा असते. परंतु प्रत्येकाच्याच नशिबात हे भाग्य नसते. मात्र सोनगाव, ता. बारामती येथील ताटे कुटुंबीयांनी देशसेवेचे व्रत घेतले आहे. वडील ,सुभेदार कै.किसन पांडुरंग ताटे यांनीसुद्धा सैन्यदलात आपली सतरा वर्ष सेवा बजावली.
लहानपणापासूनच नितीन यांना वडिलांच्यामुळे देशसेवेचे बाळकडू मिळाले. त्यामुळे मुलगा मेजर नितीन किसन ताटे यांनी सुद्धा सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सैन्यदलात युनिट 115 इंजिनियर रेजिमेंट (बॉम्बे सैपर्स ) मध्ये भरती झाले. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सीमेवर डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत भारत मातेची 17 वर्ष सेवा करून ‘लदाख’ येथुनआज मेजर नितीन ताटे यांचे सोनगाव ता. बारामती या गावी आगमन झाले.
दरम्यान मेजर नितीन ताटे यांचे गावात आगमन झाल्यावर गावकऱ्यांनी त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली. नितीन यांच्या आईने औक्षण करून ,पेढे भरवून त्यांचे स्वागत केले. गावातील लहानथोरांसह, महिलाही या सैनिकाच्या स्वागतासाठी गावात एकत्र आल्या होत्या. या स्वागत सोहळ्यामुळे मेजर नितीन ताटे हे भाराहून गेले होते.
मेजर नितीन ताटे यांचे धाकटे बंधू किरण ताटे हे छत्रपती कारखान्यात नोकरी करतात तर चुलत बंधू मेजर राजेंद्र ताटे यांनी 17 वर्ष देश सेवा बजावली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सोनगाव ग्रामस्थ व सार्वजनिक शिवजयंती उत्सव अध्यक्ष किशोर इंगवले फौजी मित्र परिवार, व्यसनमुक्त युवक, युवती संघ महाराष्ट्र राज्य, शिवराय तरुण मंडळ सोनगांव यांच्यासह ग्रामस्थांनी आयोजित केला होता.
नितीन ची पहिल्यापासूनच इच्छा होती की, वडिलांप्रमाणे त्यालाही सैन्य दलात भरती व्हायचे होते.
मेहनतआणि जिद्दीने तो सैन्यात भरती झाला.माझा मुलाने 17 वर्ष देश सेवा केली त्याचा मला आई म्हणुन खुप अभिमान वाटतो.
आणि यापुढेही तो समाजसेवेसाठी आपला वेळ खर्च करनार आहे.
नितीन यांचीआई,अलका ताटे