इंदापूर

छत्रपतीच्या कामगारांना पगार वाढ सभासदांना अडीचशे रुपये व उर्वरित रक्कम पाच तारखेला देणार

छत्रपती कारखान्याने कामगार आणि सभासदांच्या एफआरपी बाबत घेतला महत्वाचा निर्णय..

छत्रपतीच्या कामगारांना पगार वाढ सभासदांना अडीचशे रुपये व उर्वरित रक्कम पाच तारखेला देणार

छत्रपती कारखान्याने कामगार आणि सभासदांच्या एफआरपी बाबत घेतला महत्वाचा निर्णय..

बारामती वार्तापत्र

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कामगारांना पगार वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यामध्ये जे 180 कामगार अकरा हजार रुपयांवर काम करत होते त्या कामगारांना तीन हजार रुपये वाढ करून 14 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच 8250 रुपये पगारावर घेतलेल्या कामगारांना अकरा हजार रुपये पगार करण्यात आला तसेच सिविल रोजंदारी करणाऱ्या कामगारांना आठ हजार रुपये मासिक वेतनावरून दहा हजार रुपये वेतनवाढ करण्यात आले मागील आठवड्यात छत्रपती कारखान्याच्या हंगामी कामगारांना वेतन वाढ व त्यासाठी आंदोलन पुकारले होते त्यावेळी संचालक मंडळाने येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये यावर निर्णय काढून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन कामगारांना दिले होते त्यामुळे आज झालेल्या कामगारांच्या बैठकीत सभासद व कामगारांना पगार वाढ व कायम हंगामी सेवक अशी वाढ देऊन तसेच सभासदांचे राहिलेल्या frp रकमेचा बैठकीमध्ये निर्णय होऊन सभासदांना उद्या लगेच 250 रुपये प्रति टन बँकेत जमा करणार असून उर्वरित फरकाची रक्कम पाच तारखेला देण्यात येईल असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले या वेळी कामगारांना वरील निर्णय सांगण्यासाठी दत्त मंदिर येथे सभा घेऊन कामगारांना वरील निर्णय सांगितला त्यावर काही कामगारांनी अजूनही अपेक्षित वाढ मिळावी यासाठी आग्रह केला परंतु प्रशांत काटे ,पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याची परिस्थिती सांगून आगामी गाळप हंगाम खूप मोठा असल्याने तसेच पुढील वर्षीचा हे गाळप हंगाम मोठा असल्याने सभासद ज्याप्रमाणे सहकार्य करतात त्याचप्रमाणे कामगारांनीही सहकार्य करण्याची विनंती कामगारांना केली त्यावर कामगारांनी चेअरमन व माजी चेअरमन यांच्या विनंतीला मान देऊन दिलेली वाढ मान्य असल्याचे सांगितले या बैठकीसाठी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे उपाध्यक्ष अमोल पाटील साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, संचालक अॅड रणजीत निंबाळकर , डॉ दीपक निंबाळकर, राजेंद्र गावडे कारखान्याचे कार्यकारी संचालक जीएम अनारसे यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते

Related Articles

Back to top button